यांनी पिण्याच्या पाण्याची लाईन फोडली……

हडपसर:
महम्मदवाडी सर्वे क्रमांक 85 आणि 86 मध्ये सध्या पुणे महानगरपालिकेतर्फे 30 मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी अंतराळ दाराकडून रोज खोदाई करण्यात येते. दुपारी चारच्या सुमारास जेसीपी ने जमीन खोदत असताना पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीला जेसीबीचा दात लागल्याने वाहिनी फुटली.

मोठ्या प्रमाणात पाणी आजूबाजूच्या शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले. त्यामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी वाडकर मळ्यातील शेतकरी गुलाब वाडकर तुषार वाडकर लक्ष्मण वाडकर यांनी केलेल्या आहेत. कंत्राट दराकडून निष्काळजीपणे काम होत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे. शेतकऱ्यांनी यावर तीव्र नापसंती दर्शवित आपले नुकसान भरून देण्याची मागणी केलेली आहे.

भर उन्हाळ्यात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई चालू आहे. अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार दिवसाला पाणी येत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा लागत आहे. तसेच त्यांना पाणी देखील वेळेवर मिळत नाही.

पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. असे असताना महानगरपालिकेकडून अधिकारी वर्ग रस्ता तयार करणारे कंत्राटदार बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या फुटत असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे

अगोदरच उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असताना पुणे महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात नाही त्यातच अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा अपय होत असताना दिसत आहे. यावर पुणे महानगरपालिका लष्कर पाणीपुरवठा विभाग अडचणी कार्यालय तसेच वानवणीशे तरी कार्यालय याकडून या प्रश्नावर कशा पद्धतीने तोडगा काढणार जाणार आहे याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल.

होळकर मळ्यातील शेतीचे नुकसान करणाऱ्या
बेजबाबदार कंत्राट दारावर पुणे महानगर पालिका पाणीपुरवठा विभाग काय कारवाई करणार हे पहावी लागेल ?