ससाणेनगर रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

हडपसर,
गेले तीन आठवड्यापासून 600 मिलिमीटर व्यासाची मैला पाणी मोहून घेणारी वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आलेली आहे.ससाणे नगर हडपसर मुख्य रस्त्यावर सध्या दुचाकीस्वार अनेक वाहनचालक, पादचारी, महिला, वृद्ध, शाळकरी मुले मुली यांना प्रचंड त्रासात सामोरे जावे लागत आहे

अगोदरच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी असते. महंमदवाडी, हांडेवाडी, काळे बोराटे नगर, ससाणे नगर, अवताडे वाडी होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, सातव नगर, वाडकर मळा, ससाणे वस्ती सय्यद नगर अशा विविध भागात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

त्याचप्रमाणे ससाणे नगर या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढल्याने या रस्त्याला मोठ्या प्रमाणात व्यापारी आलेली आहेत तसेच या रस्त्यावर राष्ट्रीयकृत बँका दवाखाने व्यापारी संकुले मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वरील बारावाड्यांकडे जाण्यासाठी हडपसरला येण्यासाठी हा एकमेव रस्ता उपलब्ध आहे.

1998 साली डीपी रस्ता मंजूर झाला सदर रस्ता 30 मीटर रुंदीचा आहे. परंतु या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. नागरिकांना पादचारी मार्ग उपलब्ध नाही. जे जागा मालक आहेत त्यांना पीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे
सध्या रस्त्यावर मैला पाणी वाहून नेण्यारी वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराला अनेक वेळा सांगू नये ठेकेदार काम जलद गतीने पूर्ण करत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तीन आठवड्यापासून मी काम सुरू आहे काम अत्यंत संत गतीने चालू आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यातच त्याने माती आणून टाकल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात झूळ निर्माण झालेली आहे त्यामुळे येथील प्रदूषणात भर पडलेली आहे. ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होतच असते त्यातच भर म्हणून हे काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

ससाणे नगर नागरिक कुस्ती समितीने इशारा दिलेला आहे. आठ दिवसाचे काम जर थांबवले नाही. तर जनआंदोलन करून ही काम बंद पाडण्याची अशी माहिती असा नगर नागरिकत समिती आणि आधार प्रतिष्ठान यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय यांना दिलेली आहे.