अनधिकृत फळभाजी विक्रेत्यांनी व्यापला रस्ता

मुकेश वाडकर, हडपसर
सासवड रस्ता ,ससाणे नगर , हांडेवाडी , महमंदवाडी, सय्यद नगर,मतंर वाडी, शेवाळे वाडी, रामटेकडी dp रस्ता, या सर्व रस्त्यावरील संपूर्ण भागात वाहतुकीला अडथळा : उपाययोजनांची मागणी..
सोलापूर, सासवड कडून मुख्य शहराकडे येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर व पदपथावर अनधिकृत फळभाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांमुळे अंत्यत वर्दळीचा मार्ग असलेल्या पुणे- सोलापूर रस्त्या, हडपसर सासवड , हडपसर ससाणे नगर, हांडेवाडी, सय्यद नगर, महांडवाडी , उंड्री, पिसोळी, मंतर वाडी, रामटेकडी रस्त्यावर वरील ससाणे नगर , सातव वाडी , गोंधळे नगर, १५ नंबर , गाडीतल, सातव नगर , सय्यदनगर , जाधव मळा, या संपूर्ण भागात वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
पदपथ असतानाही फळे व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो रस्त्याच्याकडेला उभे केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. आसपासच्या गावांमधून भाजीपाला, फळे घेऊन येणारे टेम्पो मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उभे असतात. अशा व्यावसायिकांकडे खरेदी करण्यासाठी वाहनचालक व दुचाकीस्वार रस्त्यालाच गाडी उभी करून खरेदी करत वाई जारी 5 असणाऱ्या महापालिकेचा अतिक्रमण याक करत
असल्याचे पाहायला मिळत आहे.
फळ, भाजीपाला विक्रेत्यांकडून एकीकडे शहरासह सर्व उपनगरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे पूर्व उपनगरातील हडपसर क्षेत्रीय कार्यालय व वानवडी राम टेकडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या भागात अनधिकृत भाजी विक्रेत्यांचाही सुळसुळाट झाला आहे. स्वारगेटकडून पूर्व उपनगराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यासह लहान-मोठ्या रस्त्यांना अनधिकृत फळभाज्या विक्रेत्यांनी विळखा घातला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांना आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मिळत असलेल्या वरदहस्तामुळे त्यांची संख्या वाढली आहे.
अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे टेम्पो फिरतात. दुसरीकडे टेम्पोच्या पुढे दुचाकीवर जाणारा व्यक्ती ‘कारवाईचा टेम्पो येत आहे’, असे सांगत असतो.
नियमांचे उल्लंघन…
■ सासवड रस्ता , सातव वाडी, गोंधळे नगर, १५ नंबर, माळवाडी , एस.एम जोशी कॉलेज समोर, हांडेवाडी रस्ता , सय्यद नगर रस्ता , ससाणे नगर , मंतर वाडी , शेवाळे वाडी, लक्ष्मी कॉलनी, अशा विविध ठिकाणी अनेक भाजी विक्रेते चौकाचौकात आणि रस्त्याच्याकडेला ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे.
कारवाई होणार आहे हा निरोप बाहेर येतो कसा….?
अतिक्रमण विभागातील काही झारीतील शुक्राचार्य कर्मचारी, शिपाई व्यावसायिकांना फोन करून सतर्क करतात. आज कारवाई होणार अशाच प्रकारे ‘एखादा वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यास येणार आहे, थांबू नका’ असेही निरोप व्यावसायिकांना दिले जातात.
हडपसर ससाणे नगर या स्स्त्याने ये-जा करतो. हा स्स्ता वर्दळीचा असताना येथे बेकायदा रस्त्यालगत भाजीपाला विक्रीचे टेम्पो सतत उभे असतात. त्यामुळे येथून वाहने चालवताना अडचण येते. नागरिकांचीही खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे अपघात होण्याची भीती वाटते. याबाबत अतिक्रमण विभागाने तत्काळ कारवाई करावी. – नितीन डांगमाळी , वाहनचालक.
हडपसर ससाणे नगर नागरी कृती समितीचे सदस्य रोहन ससाणे ,अर्जुन सातव , नाजीम शेख, शराफत पानसरे, सुरेश हिंगणे, मोहन बलाई, मयूर फडतरे, रणजीत चव्हाण, दिलीप गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, पंढरीनाथ बनकर यांनी* हडपसर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग पुणे मनपा, आयुक्त कार्यालय यांचे कडे लेखी तक्रार तसेच अनधिकृत आणि बेकायदेशीर* अतिक्रमणावर कारवाई करण्याची लेखी मागणी देखील केली आहे*.