विद्यार्थ्यांचा कॅनॉल मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू

हडपसर :
येथील समर्थ अमोल यादव ( वय वर्ष 14 ) या विद्यार्थ्यांचा कॅनॉल मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.हा साधना विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातववाडी माजी शाखाप्रमुख अमोल यादव यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. शनिवार (दि. 22) रोजी सातववाडी येथील ग्रामदैवत बापुजी बुवा मंदिरालगत कालव्यामधील पाण्यात तो पोहण्यासाठी उतरला असता.

वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाला होता. आज (दि. 24) रोजी त्याचा मृतदेह यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरी आंदि येथे कॅनल मध्ये मिळून आला.

पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमी येथे आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
