पंढरपुर नामदेव स्मारकासाठी मार्ग मोकळा

नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर यांचे मागणीनुसार बहुचर्चित नामदेव समाजोन्नती परिषदेचा पंढरपुर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारकाबाबत प्रकल्पाची आढावा बैठक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीला विविध शिंपी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नामदेव समाजोन्नती परिषद सोडुन इतर संघटनांना दिनांक ९ एप्रिल २०२५ पर्यंत प्रकल्पाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.

जुलै महिन्यात आषाढी वारी पर्यंत श्री संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारकाचे भुमीपुजन करण्याचे प्रयत्न शासनातर्फे करण्यात येतील असे सांगितले. तसेच नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे यापुर्वीच स्मारकाच्या आराखड्याचे व प्रकल्पाचे सादरीकरण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मिटिंगमध्ये नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी आपली भुमिका विषद करताना नामदेव स्मारक प्रकल्पावर परिषद सन २०१४ पासुन काम करीत असुन वेळोवेळी शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. आंज ही करीत असल्याचे सांगितले तसेच सदर प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची /रेल्वे बोर्डाची जागा महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतर करण्यासाठी प्रचंड मोठी मेहनत घेतली.

अनेक वेळा दिल्ली वाऱ्या केल्या असल्याचे सांगितले त्यामुळे शिंपी समाजातील इतर सर्व संघटनांनी नामदेव समाजोन्नती परिषदेच्या मागे उभे राहुन शिंपी समाजाची एकी दाखवण्याचे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी यांना नामदेव समाजोन्नती परिषदेचे सहसचिव प्रवीण शित्रे यांनी सदर प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझाईन कन्सल्टंट व आर्किटेक्ट नासपतर्फे ह्या प्रकल्पावर काम करणार असल्याने त्यांच्याबरोबर आपली मिटींग त्वरीत करावी अशी मागणी केली.
नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी इतर शिंपी संघटनांनी प्रकल्प डिझाईन मध्ये काही सुचना असतील तर त्याबाबत नामदेव समाजोन्नती परिषद निश्चित चर्चा करेल असे सांगितले.
मिटिंगला नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे अध्यक्ष संजय नेवासकर, सहसचिव प्रवीण शित्रे, सातारा जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे, पंढरपूर येथील वसंतराव पिसे, माळशिरस येथील अशोक (आण्णा) बोंगाळे, सोलापूर येथील अनंता घम, राजेश केकडे
नामदेव क्षत्रीय एकसघांचे अध्यक्ष महेश ढवळे, सोलापूर बहुउद्देशीय शिंपी समाजाचे अध्यक्ष युवराज चुंबळकर आदी समाज बांधव हजर होते.प्रास्ताविक व आभार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले