समाविष्ट झालेल्या ३२ गावांची कर, पाणी यासह अन्य विषय मंत्रालयात

खडकवासला,
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांची कर, पाणी यासह अन्य विषयांवर मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनात दिली. याबाबतची लक्षवेधी आमदार भीमराव तापकीर यांनी मांडली होती.

समाविष्ट गावांनी महापालिकेला किती मिळकत पुणे कर दिला आणि महापालिकेने काय सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, पुणे महापालिका आयुक्तांनी या गावांबाबत कोणताच निर्णय घेतला.

नाही, असा मुद्दा आमदार तापकीर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर मंत्री सामंत यांनी हे उत्तर दिले. ३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे.

मात्र त्यातुलनेत ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुद्ध पाणीपुरवठा महापालिका करत आहे. त्यामुळे या गावांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून अनेकवेळा आंदोलने केली, आयुक्तांना निवेदनेही दिली.

मात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही, असेमात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही, असे तापकीर म्हणाले.