HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी मुदतवाढ; जाणून घ्या, नवीन डेडलाईन…

Oplus_131072
पहिल्यांदा 30 मार्च नंतर 30 HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी मुदतवाढ; जाणून घ्या, नवीन डेडलाईन… पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज आहे.
मुंबई : राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहनमालकांना मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता ३ संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरुन सरकारवर टीका देखील झाली होती. सध्या 30 मार्च नंतर 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी HSRP बसवल्याचा अंदाज आहे.