खोदाई नंतर रस्ता दुरुस्त कोण करणार?

हडपसर : ससाणेनगर खोदाई नंतर रस्ता दुरुस्त खोदाई नंतर रस्ता दुरुस्त मैला पाणी वाहून नेणारी पाईप लाईन टाकण्यात आली . प्रथम रस्ता खोदण्यात आला. काम पूर्ण करण्यात आले. परंतु काम झाल्यावर रस्ते खोदाई नंतर रस्ता दुरुस्त केलेला नाही.

स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असून वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.

स्थानिक नागरिक रामनाथ देसाई म्हणाले आम्हा वृद्धांना चालायला रस्ता नाही. फूटपाथ नाही ,आम्ही नागरिकांनी चालायचे कुठून असा प्रश्न पडला आहे.

ठेकेदाराने त्वरित रस्त्यावर डांबर टाकून रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा. गेले आठ दिवस झाले रस्तावर मातीचे ढिगारे पडले असून दुचाकी स्वारांना ,रिक्षा चालकांना वाहने चालविता येत नाही.
