गावठी हातभट्टी तयार दारुचा मोठा साठा जप्त

हडपसर: गावठी हातभट्टी तयार दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आले. सुमारे तीस हजार किमतीचा माल जप्त करून एकास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
होळी व धुळीवंदनाचे सणाचे अनुशंगाने वानवडी पोलीस ठाणे अंकीत सुरक्षानगर पोलीस चौकीचे कार्यक्षेत्रात उपलब्ध खाजगी वेगवेगळया दुचाकी वाहनांवरुन पेट्रोलिंग करीत असताना समर्थनगर हिंगणेमळा हडपसर येथे सहा. पोलीस उप निरीक्षक किशोर राणे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, समर्थनगर हिंगणेमळा रोड येथे एक इमस तयार हातभट्टीचा दारु विक्री करीत आहे.
अशी बातमी मिळाली असता वरिष्ठांचे आदेशाने चौकीच्या स्टाफसह छापा कारवाईसाठी लागणाऱ्या साहीत्यासह वरिष्ठानी दिलेल्या सुचनांप्रमाणे प अचानकपणे छापा टाकुन दारु विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेतले चाँद अमीन सय्यद वय ४८ वर्षे धंदा चालक रा. स.नं. ८९ गल्ली नं. ६ समर्थनगर, हिंगणेमळा रोड, हडपसर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याचे हातात असलेली नायलॉनच्या पोत्याची पाहाणी करता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु मिळून आली. तसेच पत्र्याचे शेडच्या लगत लोखंडी पत्र्याखाली लपवुन ठेवलेले ३५ लिटर मापाची तयार हातभट्टी दारु भरलेली हत्ती कॅन एकुण ०८ नग, त्याचे शेजारी नायलॉनच्या ०३ पोत्यात तयार हातभट्टीची दारुच्या पारदर्शक छोटया पिशव्यात भरलेली तयार हातभट्टीची दारु व दारु विक्री करणाऱ्या इसमाकडे रोख रक्कम ३१०/- रु असा एकुण ३०,३१०/- रुपये मुद्देमाल मिळुन आल्याने इसमाचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस उप-आयुक्त राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षानगर पोलीस चौकी प्रभारी पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे , सहा पोलीस उप निरीक्षक किशोर राणे व दिवटे, पारधी यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.