काँग्रेस ची सत्ता येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे-अरविंद शिंदे

हडपसर : येत्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस ची सत्ता येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे. प्रामाणिक निष्ठा हीच आपल्याला महापालिकेमध्ये विजयाचा झेंडा रोवेल. असे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मत व्यक्त केले.

हडपसर गाव महेश प्रगती मंगल कार्यालयात हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,हडपसर विधानसभा निरीक्षक सुजित यादव, उपनिरीक्षक देविदास लोणकर, हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, हडपसर महिला विधानसभा अध्यक्ष उर्मिला आरु, युवक अध्यक्ष मतीन शेख, इंदिरा तुपे, पुष्पा गायकवाड, पल्लवी सुरशे, राणी आरु, माया ससाणे, गणेश फुलारे बाळासाहेब हिंगणे, नितीन आरू, ज्ञानेश्वर कांबळे, संतोष सुपेकर वैभव डांगमाळी आदी उपस्थित होते.

यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंद आला होता.माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले, काँग्रेस हाच तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहेत.
