दत्ता जगताप, विजय सकट यांची नियुक्ती
पुणे –
लहुजी शक्ती सेना या राज्याव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी दत्ता जगताप यांची फेर नियुक्ती तर पुणे जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष पदी विजय सकट यांची नियुक्ती करण्यात आली.
विजय सकट हे २००४ मध्ये लहुजी शक्ती सेनेच्या शाखेच्या खजिनदार पदी कार्यरत होते .२००६ मध्ये पूर्व हवेली अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली त्या पदालाही त्यांनी उत्तम प्रकारे न्याय देण्याचे काम केलं.हवेलीतील प्रत्येक गाव पिंजून काढले. नंतर २०१७ ला हवेली तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. २०२१ मध्ये पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्षपद विजय सकट यांना देण्यात आले. लहुजी शक्ती सेने चे सरसेनापती विष्णू कसबे यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,प्रदेशयुवक अध्यक्ष सचिन क्षीरसागर, राज्य उपाध्यक्ष अमोल चव्हाण, राज्य संपर्कप्रमुख नितीन वायदंडे, प्रदेशाध्यक्ष विदयार्थी आघाडी ऍड हेमंत खंदारे ,राज्य सोशल मीडिया अध्यक्ष नितीन दोडके ,यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोर कमिटी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विजय सकट यांना देण्यात आली.