Blog

हडपसर अमरधाम दफनभूमीत जागा अपुरी

मुकेश वाडकर,

हडपसर,

हडपसर पंचक्रोशी मध्ये लिंगायत समाज लोकसंख्या १० हजाराच्या पुढे आहे. सद्या उपलब्ध असलेली हडपसर अमरधाम दफनभूमी माळवाडी येथील जागा अपुरी पडत आहे. गेल्या अनेक वर्षात पुणे मनपा कडून फक्त माती टाकण्यात येते . मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आल्याने उंचवटा झाला आहे. सध्या दफन करण्यासाठी खड्डा घेतल्यावर त्यामध्ये मृत शरीरातील हाडे सापडतात. पुणे मनपा ने आमची अडचण समजून घ्यावी. आम्हाला तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वीरशैव लिंगायत मंडळ यांनी केली आहे.


दफन भूमीच्या जागेत खाजगी वखार व्यावसायिकाने विना परवाना पुणे मनपाच्या जागेवर अतिक्रमण बेकायदेशीर व्यवसाय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी हडपसर ग्रामस्थांनी केली आहे.

सध्या उपलब्ध स्मशानभूमीची अवस्था ठीक नाही. गवत खुप असते, पावसाळ्यात अवस्था वाईट असते, त्यामुळे डास खूप असतात. लोकांना बसण्यासाठी व्यवस्था अपुरी आहे. जमीन समतल नाही.
व्यवस्थित आखणी नसल्याने खड्डा कोठे खोदायचा हे समजत नाही.सुशोभीकरण व्हावे


सध्या उपलब्ध असलेली जागा की आम्हाला कमी पडत असून तिथे दफन करण्याकरता अनेक अडचणी पुणे महानगरपालिकेने आम्हाला नवीन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत समाजाची आहे.

-रवींद्र लाटनेकर
अध्यक्ष – वीरशैव लिंगायत मंडळ हडपसर


या दरम्यान पुणे महानगरपालिका हडपसर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की जागा उपलब्ध करून देणे बाबत पुणे मनपाच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाशी तातडीने बोलून जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

Related Articles

Back to top button