अरुंद रस्त्यामुळे वारंवार अपघात
हडपसर
तुकाईदर्शन भागात पुन्हा एकदा खांबावर गाडी धडकल्यामुळे विजेचा चा खांब गाडीवर कोलमडला. त्यामुळे काही काळ सकाळी वाहतूक कोंडी झाली .
सकाळी शाळेत वाहतूक करणाऱ्या बस ,आयटी पार्क ला वाहतूक करणाऱ्याची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे .त्यामुळे गाडीचे नियंत्रण सुटल्यामुळे असे अपघात होतात .
महानगर पालिकेत असलेला हा भाग आता नगरपरिषदेत गेल्यामुळे ह्या रस्त्याच्या कामाचा निधी हि रद्द करण्यात आला .त्यामुळे ह्या रस्त्याला आता कोणीही वाली आहे का नाही हा प्रश्न नागरिक विचारत आहे.
ह्या रस्त्यावर कायम छोटे मोठे अपघात रोज घडत असतात .ह्या रस्त्यावर खड्डे डांबराने बुजवले गेले परंतु त्यातही व्यवस्थित पणा नाही तेही अपघाताचे कारण आहे .आयटी पार्क ला रात्रभर वाहतूक करणारे चालक ह्याची अपुरी झोप आणि त्यात रस्त्याची दुरावस्था हे मुख्य कारण आहे. त्यामुळे भविष्यात ह्या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.