‘ यांनी ‘ दिली विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट

Oplus_131072
हडपसर :
हडपसरमधील साधना विद्यालयात जेष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली. या पुस्तकांचा स्वीकार विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केला.
याप्रसंगी पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, ग्रंथालयप्रमुख प्रदीप बागल, प्रतापराव गायकवाड, अनिल वाव्हळ उपस्थित होते.
प्राचार्य जाधव यांनी सांगितले की, बालगुडे यांनी दिलेल्या पुस्तकांमध्ये ‘स्पर्धा परीक्षेतील यशस्वी संघर्षयात्री’ दी इलुस्ट्रेटेड लाइट ऑन योगा, बीकेएस अय्यंगार, जातीव्यवस्थेचे निर्मूलन डॉ. बी. आर. आंबेडकर, विविध खेळ आणि नियम या पुस्तकांचा समावेश आहे.
दरम्यान, डॉ. बालगुडे म्हणाले की, प्रत्येकवेळी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकतो आहोत का, हे तपासले पाहिजे. पुस्तक वाचलं जात नाही, वाचन कमी झालं आहे, असं म्हणण्याऐवजी स्वतः पुस्तक वाचण्याचा संकल्प करा. तुमची मुलेसुद्धा पुस्तक वाचायला लागतील. सोशल मीडियावरील माहिती घेत असताना चांगलं काय आणि वाइट काय हे सुद्धा तपासून पाहा.
चांगल्या गोष्टींचे अवलोकन करण्यासाठी आपण नव्या वर्षाच्या प्रारंभापासूनच सुरुवात करू असा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.