ओढ्यातील मैलापाणी वाहून नेणारे चेंबर तुंबले

मुकेश वाडकर,
हडपसर : हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग 26 मधील महमंद वाडी भागातील वाडकर मळा येथे ओढ्यातील मैलापाणी वाहून नेणारे चेंबर तुंबले आहे. त्यातून दुर्गंध युक्त पाणी बाहेर वाहिल्याने वाडकर मळा ,ससाणे वस्ती, सय्यद नगर, जाधव मळा ,ससाणे नगर ,हडपसर गाव येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वडाची वाडी , पिसोळी , उंड्री, महंमदवाडी ,आंबेकर मळा , जाधव मळा ,वाडकर मळा ,ससाणे वस्ती , सय्यद नगर,ससाणे नगर, हडपसर, मगर पट्टा मुंढवा येथे वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यात पालिकेने मैलापाणी वाहून नेणारे चेंबर बांधले आहे . पण ते चेंबरचे वर्ष भरातच दुरुस्ती काम निघत आहे.

यावरून त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले याची झलक दिसत आहे. पालिकेच्या कामातील भ्रष्टाचार उघडा होत आहे. ठेकेदार , अधिकारी , अभियंता सर्वांच्या मिलीभगत मुळे पालिकेच्या कामाची वाट लागल्याचे चित्र हडपसर सह संपूर्ण पुण्यात दिसत आहे.
अभियंता वाडकर मिलिंद म्हणाले की गेल्या वर्षी चेंबर दुरुस्ती केली होती. निकृष्ट पद्धतीने बांधलेल्या चेंबर मुळे वारंवार त्यावर दुरुस्ती खर्च करावा लागत आहे. हा खर्च कर भरणाऱ्या नागरिकांच्या खिशातून होत आहे . दुरुस्ती कामाचा संपूर्ण खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा. त्याला काळ्या यादीत टाकून त्याचे ठेकेदार परवाना रद्द करावा. वाडकर रोहित म्हणाले दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वातावरण दूषित झाले आहे.

लहान मुले, वृद्ध ,यांना सर्दी खोकला संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे चेंबर ची दुरुस्ती तातडीने होणे अत्यंत गरजेचे आहे. ससाणे वस्ती वरील चंद्रकांत सुतार म्हणाले की ओढ्यातील मुख्य वहिनी तुंबली की ससाणे वस्ती वरील सर्व लेन मधील वाहिन्या तुंबतात. तुंबलेले पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते दूषित पाणी पुरवठा होतो.नागरिकांना पोटाचे गंभीर आजार होतात. नागरिकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड होतो.
मच्छिंद्र वाडकर म्हणाले की ओढ्यातील चेंबरांचे काम पालिकेच्या नियमानुसार झालेले नाही . चेंबर करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने वर्षभरात त्याचे दुरुस्ती काम निघत आहे. याला संपूर्ण रित्या अधिकारी जबाबदार असून त्यांच्या वर कामात कसूर केल्या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करावा. त्यात दोषी अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करावा .
नागरिकांनी केलेल्या मागण्या
संपूर्ण काम उत्कृष्ठ साहित्य वापरून पुन्हा करण्यात यावे त्याचा सर्व खर्च ठेकेदाराकडून वसूल करावा संपूर्ण चेंबर कामाचे ऑडिट करावे. संपूर्ण कामाची चौकशी करून अहवाल सादर करावा, दोषी अधिकारी ठेकेदार यांच्या वर पालिकेच्या नियमानुसार कारवाई करावी . दोषी अधिकारी , यांना तातडीने निलंबन करून गुन्हा दाखल करावा, ठेकेदाराचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे . बाळासाहेब ससाणे, वाडकर बंडोपंत, प्रफुल्ल ससाणे, संतोष जाधव, नाझीम शेख, शराफत पानसरे यांची तातडीने चेंबर दुरुस्तीची मागणी केली आहे.
यादरम्यान पालिका अधिकारी पुरम यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी सांगितले.