शिवसेना उध्दव ठाकरे गटाला पडणार खिंडार: ‘ हे ‘ नगरसेवक भाजपा मध्ये करणार प्रवेश

मुकेश वाडकर, हडपसर :
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे हडपसर मधील १ माजी नगरसेविका समवेत पुण्यातील ४ नगरसेवक करणार भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
विशाल धनवडे , बाळा ओसवाल,संगीता ठोसर,पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या सर्वांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याचे माहिती मिळत आहे
महापालिकेतील १० नगरसेवक ठाकरे पक्ष्याचे आहेत .शिवसेना फुटीनंतर प्रमोद भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाण्यास पसंती दिली. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच येरवड्यातील अविनाश साळवे यांनी पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या अपेक्षेने काँग्रेस मध्ये प्रवेश केला.त्यामुळे या पक्षाचे आठ नगरसेवक उरले आहेत. त्यांचीही दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्या वरून चर्चा सुरू होती.