क्राईम

जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या विरोधी पथकाने मारला छापा

हडपसर: येथील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या विरोधी पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास पांडुरंग हिंगणे, संतोष जयसिंग देशमुख, अशोक करंजीकर, कुमार यल्लप्पा अलकुंटे, विजय दत्तात्रय तुपे यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर गावातील डांगमाळ आळीतील एका घरात पत्यांवर पैसे लावून जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे.

Related Articles

Back to top button