कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधाविरोधात पुणे स्टेशन परिसरात आंदोलन

कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधाविरोधात पुणे स्टेशन परिसरात आंदोलन

राज्यभरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग; अनंतराव चोंधे-पाटील आमरण उपोषण सुरू..

पुणे : कृषी विभागात नव्याने करण्यात आलेला आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुणे स्टेशन परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनंतराव चोंधे-पाटील हे संपूर्ण आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

नव्या आकृतिबंधामुळे कृषी विभागातील पदरचना, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्या आकृतिबंधाचा फेरविचार करून तो रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. पुणे स्टेशन परिसरात आंदोलन सुरू असल्याने परिसरात मोठी गर्दी झाली असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

पीएमटी बससेवेवर परिणाम

आंदोलनामुळे पुणे स्टेशन परिसरातील पीएमटी बससेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले. प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे बस प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय झाली.

आंदोलनकर्त्यांकडून कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून नव्या आकृतिबंधाबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, संपूर्ण आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!