विद्यानंद बापट यांच्यावर ‘भ्याड हल्ला’; मारहाणीचा व्हिडिओ समोर

विद्यानंद बापट यांच्यावर ‘भ्याड हल्ला’; मारहाणीचा व्हिडिओ समोर

पुणे : गणेशोत्सवातील डीजेच्या वापराविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून, बापट यांच्यावर झालेल्या या प्रकाराला ‘भ्याड हल्ला’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापट हे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. त्यावेळी काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती बापट यांच्याशी झटापट आणि मारहाण करताना दिसत आहेत.

गणेशोत्सवातील मोठ्या आवाजातील डीजेविरोधात बापट यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे या भूमिकेचा मारहाणीच्या घटनेशी संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मारहाणीमागील नेमके कारण आणि घटनेत सहभागी व्यक्तींची भूमिका पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

मतभेद असतील तर ते चर्चेतून मांडण्याऐवजी मारहाणीचा मार्ग स्वीकारणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!