
पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
हडपसर,
गणपती बाप्पांची मूर्ती कशी बनवतात. खूप अवघड काम असेल, एवढी सुंदर मूर्ती कशी तयार केली जाते.अशा मुलांच्या मनातील अनेक प्रश्नांना एका कार्यशाळेत उत्तरे मिळाली. निमित्त होते पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्ती बन विण्याच्या कार्यशाळेचे. हडपसर येथील सिद्धेश्वर व शिवसमर्थ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या पर्यावरण पूरक गणपती बाप्पा या कार्यशाळेचे आयोजन सातववाडी येथे केले होते.
मुलांनी बनविलेल्या गणेशमूर्ती पाहून त्यांच्या पालकांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षण व साहित्य निशुल्क होते.कार्यशाळेत ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा.याचे प्रबोधन करण्यासाठी व मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी महात्मा फुले वसाहत येथील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी या पर्यावरण पूरक गणपती बाप्पा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.गणपत शितोळे यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले या उपक्रमाचे आयोजन शिवसमर्थ संस्थेच्या मनीषा वाघमारे व सिद्धेश्वर संस्थेने डॉ. शंतनु जगदाळे यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष अमर तुपे सारस्वत संस्थेच्या गीता साळुंखे, सुरज अग्रवाल, पार्थ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

