मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघ ओबीसी आघाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमात सुमारे १०० ते १५० महिलांनी सहभाग घेत रक्तदानासाठी पुढाकार घेतला.

या शिबिराला नगरसेविका रंजना (नानी) टिळेकर, नगरसेवक मारुती (आबा) तुपे, नगरसेविका उज्वलाताई जंगले, गणेश घुले, हडपसर विधानसभा मतदारसंघाध्यक्ष आकाश डांगमाळी, बाबासाहेब हिंगणे, नितीन आरू, स्वप्निल डांगमाळी, मारुती भुजबळ, सुमित टिळेकर, शिवा गवळी, मांजरी गावच्या सरपंच उज्वला टिळेकर, स्मिताताई वाघ, सोनल कोद्रे, नंदा हिंगणे, भावना काबळे, रेखा अबनावे, स्वाती, राणी चोरघडे, कांचन घाडगे, जयश्री कोदे, नीलम गोरे, वैशाली, मीनाताई, कविताताई देशमाणे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे नियोजन व यशस्वी आयोजन ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. दिपाली पांडुरंग माटे यांनी केले. त्या पंचायत राज ग्रामविकासच्या सहसंयोजक तसेच हिराबेन मोदी महिला सहकार संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!