गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

महापालिकेच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय; शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार

पुणे,

पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनवरील अत्यावश्यक विद्युत आणि यांत्रिक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार (३० जुलै) रोजी शहरातील अनेक भागांचा दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (३१ जुलै) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार रमटेकडी, वानवडी १२५ एमएलडी, बकरी हिल, हाय सर्व्हिस, कॅम्प, रेसकोर्स, टाकसाळ आणि लष्कर क्रमांक २ येथील पंपिंग केंद्रांवर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

प्रभावित भाग : हडपसर ,ससाणे नगर,गाडीतळ, गोपाळपट्टी, सातववाडी, हडपसर गावठाण, महंमदवाडी, काळेबोराटे नगर, रामटेकडी परिसर, वानवडी, बिबवेवाडी, कोंढवा, एनआयबीएम रोड, उंड्री, बी. टी. कावडे रोड, घोरपडी, मगरपट्टा, कॅम्प, पुणे कॅन्टोन्मेंट, रेसकोर्स परिसर, वेताळबाबा, गंजपेठ, भवानी पेठ, कसबा पेठ, भवानीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ आणि महात्मा फुले पेठ आदी परिसर.

महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिरा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!