
पत्रकारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान
पुणे,
डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष राजा माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली CID विभागाचे पोलीस अधिक्षक दिनेश बारी यांची सदिच्छा भेट घेत विविध सामाजिक, पत्रकारिता आणि जनहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीत बारी यांनी पत्रकारिता क्षेत्राबाबत आपले विचार मांडत सकारात्मक संवाद साधला. त्यांच्या साधेपणाने, दिलखुलास स्वभावाने आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाने उपस्थित पदाधिकाऱ्यांवर विशेष छाप पाडली.
यावेळी संघटनेच्या वतीने अधिकारी दिनेश बारी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने प्रतिबिंब प्रतिष्टानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पत्रकाराच्या मुलाच्या शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान केला. हा धनादेश अधिकारी दिनेश बारी यांच्या हस्ते लाभार्थी कुटुंबाला देण्यात आला. शिक्षणासाठी केलेल्या या मदतीचे उपस्थितांनी स्वागत करत संघटनेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे केंद्रीय सचिव अमोल पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे, पुणे शहराध्यक्ष विजयराव रणदिवे, कायदा सल्लागार अर्चना मारणे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंके तसेच कार्याध्यक्ष शिवाजी हुलावळे उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीमुळे पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांच्या हितासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी संघटना सातत्याने कार्यरत राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

