समान पाणीपुरवठ्यासाठी ठोस निर्णय आवश्यक!

विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदे मध्ये लक्ष्यवेधी मांडून संपूर्ण हडपसर विधानसभा क्षेत्रातील पाणी प्रश्नाला वाचा फोडली आहे.
संपूर्ण हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या भागाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ह्या भागातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात
पुणे महानगरपालिकेने २०१८ साली दक्षिण पुण्यातील कोंढवा, कात्रज, येवलेवाडी, पिसोळी, गुजरवाडी, उंड्री आणि पूर्व पुण्यातील हडपसर, मुंढवा, मांजरी, ससाणेनगर येथे २४/७ समान पाणीपुरवठा योजना जाहीर केली होती. मात्र, २०२५ साल उजाडले तरीही ही योजना अद्याप अपूर्ण आहे.
योगेश टिळेकर यांनी ५ ऑक्टोबर २०२० रोजी या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते आणि त्यासाठी त्यांना जेलमध्येही जावे लागले होते.
त्यामुळे, या अधिवेशनातच यासंदर्भात बैठक घेण्यात यावी आणि पुढील महत्त्वाचे निर्णय तातडीने घेण्यात यावेत:ज्यांचा पाणीपुरवठा सुरळीत नाही, त्यांच्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात.पुढील ५० वर्षांच्या पाणी संकटाचा विचार करून, पाणी साठा १४ टीएमसी वरून २१ टीएमसीपर्यंत वाढवला जावा.खडकवासला ते फुरसुंगी या मार्गाद्वारे कॅनॉलच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांची तातडीने परवानगी घेण्यात यावी.