स्थानिक नागरिकांनी ऑनलाईन तक्रार करूनही आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

हडपसर,
पाटबंधाराच्या छोट्या कालव्यातून पिण्याची पाण्याची वहिनी गेली आहे .सिंहगड रस्ता धायरी भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात जीबीएस ह्या नवीन आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे .त्यामुळे पिण्याच्या पाण्याची वहिनी कचऱ्या मध्ये गाडली गेल्याचे चित्र दिसत आहे. वारंवार तक्रारी करून देखील आरोग्य विभाग , वरिष्ठ आरोग्य अधिकारी , कनिष्ठ अधिकारी , कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात. घनकचरा विभाग तर्फे डीप क्लीन संकल्पना राबवली जात आहे. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून फिरवले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र हडपसर मध्ये डीप क्लीन कालवा परिसरात का नाही झाले असा सवाल संदीप निगडे करीत आहे.

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग , पाणी पुरवठा विभाग , याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही. कोरड्या पडलेल्या कालव्यात मात्र कचऱ्याचे ढीग च्या ढीग उभे राहिले आहेत.
तसाच धोका हडपसर परिसरात देखील होईल अशी भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. कचरा संकलन सूक्ष्म व्यवस्थापन योजना आखून प्रत्येक नागरिकांना कडून कचरा उचलण्याची सोय नागरिकांना करून द्यावी . जेणे करून नागरिक बाहेर कोणत्याही ठिकाणी कचरा टाकणार नाही. यासाठी नागरिक , पुणे मनपा , स्वच्छ्ता दुत , कचरा वेचक यांच्यात समन्वय साधावा, कारण महागाईच्या काळात अनेक जण तुटपुंज्या पगारात घर चालवतात त्यांना सर्व खर्च पाहायचे असतात. खाजगी संस्थेचे कचरा सेवक ८० रुपये घेतात, पण हातावर पोट असणारे यांना भरणे परवडत नाही त्यांचा ही विचार व्हावा अशी मागणी दिपाली माटे यांनी केली.

कालव्यात कचरा टाकणाऱ्या विरुद्ध दंड करण्यात यावा जेणे करून कालव्यात कोणीही कचरा टाकनार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उपद्रवी नागरिकांना शिस्त लागेल अशी भावना हिरालाल अग्रवाल यांनी मांडली.

आरोग्य अधिकारी म्हणतात की कालव्याची स्वच्छ करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे असे बोलून वेळ मारून देतात.त्यामुळे कालवा परिसर , साडे तेरा नळी, रामोशी आळी, पांढरे मळा, गाडीतील , साने गुरुजी रुग्णालय मागील परिसर, साडे सतरा नळी येथे पर्यंत संपूर्ण कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. जास्त दिवस राहिल्याने तो कुजला आहे. संपूर्ण परिसरात भयंकर दुर्गंधी सुटली आहे. अश्या ह्या अत्यंत घाणेरड्या कालव्यातून पिण्याच्या पाण्याची वहिनी गेली आहे. त्यामुळे हडपसर मिळणारे पिण्याचे पाणी हे स्वच्छ आणि आरोग्यास अपाय कारक होऊ शकतो .संपूर्ण हडपसर प्रमाणेच कालव्याची स्वच्छ करण्याची जबाबदारी ही नक्की कोणाची हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

उतार वयात उत्पन्न कमी असते त्यात आजार पण यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. जीबीएस आजार झाल्यास आमची जबाबदारी कोण घेणार असा सवाल ज्येष्ठ नागरिक सत्यवान ठाकूर यांनी केला आहे.
अस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजार होतात.त्याचा खर्च ही सर्व सामान्य नागरिकाला परवडत नाही . मूलभूत गोष्टी आम्हाला वांरवार हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे जाऊन तक्रार नोंदवावी लागते .आरोग्य अधिकारी कर्मचारी उलट सुलट उत्तरे देतात.त्यामुळे हडपसर बकाल होत चालले आहे. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी प्रत्यक्ष जावून पहाव्यात त्यावर तातडीने उपाय योजना केल्यास परिसर स्वच्छ सुंदर आरोग्य दायक राहील अशी भूमिका शेवाळे वाडी ग्रामस्थ किरण बोरावके यांनी मांडली.
हडपसर मधील कालवे यांची दररोज स्वच्छ्ता करावी . नागरिकांना आणि अधिकारी यांना शिस्तीचे धडे द्यावेत. कालव्यातील पाणी शेतीला वापरले जाते .त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिक अधिकारी सर्वांनी कायद्याचे पालन करावे अशी भूमिका शेतकरी बाळासाहेब भिसे यांनी मांडली