“महावितरणच्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांच करावं काय”
सुपा , अहिल्यानगर :
महावितरणच्या गलथान कारभारा बाबत अनेक तक्रारी रोज समोर येत आहेत. परंतु महावितरणच्या हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई होत नाही ना त्यांच्या कामात सुधारणा होतेय.
महावितरणच्या याच निष्काळजीपणामुळे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावातील सरस्वती विद्यालयात मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली.
काल सकाळी या विद्यालयाच्या प्रांगणात लहान मुलं खेळत असतानाच मैदानाजवळ अनधिकृत पद्धतीने बसवलेल्या ट्रान्सफार्मरची मेन लाईनची तार तुटून मुलं खेळत असलेल्या जागेपासून काही अंतरावर पडली दैव बलवत्तर म्हणून खूप मोठी दुर्घटना टळली.
सविस्तर वृत्त असे कि सन-२००८ मध्ये महावितरणने सदर विद्यालयाची अथवा शेजारील शेतकऱ्याची परवानगी न घेता अनाधिकृतपने सरस्वती विद्यालयाच्या खेळाच्या मैदानालगत ट्रान्सफार्मर बसविला असून सदर ट्रान्सफार्मरचे अनेक वेळा मेन लाईनच्या तारा तुटने तसेत डिपी मध्ये शाॅर्टसर्किट होवून जाळ निघने असे अनेक प्रकार या ठिकानी झाले असून या बाबत शाळा व्यवस्थापन समिती ,मुख्यध्यापक तसेच बाळासाहेब काटे,विसापूरच्या उपसरपंच सायली गटणे यांनी महावितरणचे अधिकारी यांना अनेक वेळा पत्र देवूनही या बाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
तसेच ट्रान्सफार्मर ईतरत्र हालवण्या बाबत या आधिही तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या परंतू संबंधित अधिकार्यांनी त्यांचीही दखल घेतलेली नाही.
सदर ट्रान्सफार्मर तात्काळ दुसरीकडे हलवला नाही तर या बाबत संबंधित अधिकाऱ्यांवर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करुन महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याबाबत विसापूरच्या ग्रामस्थांनी सांगीतले आहे