पुण्यावर आता ‘कॉप २४’ची गस्त

Oplus_131072
नागरिकांना मिळणार जलद मदत
पुणे : पुणे शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे अस्तित्व वाढविण्यासाठी व नागरिकांना जलद मदत पुरविण्यासाठी शहर पोलिसांकडून ‘कॉप २४’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठो पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. या उपक्रमाचे येत्या १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या उपक्रमांतर्गत शहरात १२३ दुचाकी आणि ३९ मोटारींचा वापर केला जाणार आहे. या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ लावण्यात आले आहे. त्याद्वारे बीट मार्शलवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यामुळे बीट मार्शलकडून कामात हलगर्जी केली जाणार नाही. त्यांच्यावर गुन्हे शाखेचे नियंत्रण असणार आहे. हे पोलिस कर्मचारी शहरात २४ तास गस्त घालणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

१२३ दुचाकी
७२६ ‘कॉप २४’ साठी पोलिस
३९ मोटारी
वर्दीवर बॉडी कॅमेरा लावणार
■ सर्व बीट मार्शलच्या वर्दीवर बॉडी कॅमेरा लावणार.
- वर्दीच्या ठिकाणी बीट मार्शल दाखल झाल्यानंतर तेथे
घडणाऱ्या गोष्टींचे रेकॉर्डिंग होणार आहे.
■ त्यामुळे पोलिसांवर कोणी आरोप करू शकणार नाही किंवा एखादा कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागल्यास त्याचीही माहिती त्या रेकॉर्डिंगमधून कळू शकते.
■ ‘कॉप-२४’ च्या माध्यमातून पोलिस शहरात गस्त घालणार असून, घटनास्थळी तत्काळ दाखल होणार आहेत.

महिला बीट मार्शल पाठवणार
■ पोलिसांच्या हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या महिलांच्या तक्रारी
सोडविण्यासाठी महिला बीट मार्शलची रवानगी करणार आहे.
■ महिला पोलिस कर्मचारी असेल तर महिला मोकळेपणाने त्यांचे म्हणणे मांडू शकतील.
■ तक्रारदार महिलेची समस्या सोडविणे सोपे होईल, या उद्देशाने