अजित पवार अध्यक्ष असलेल्या शाळेला दणका………

.
पुणे :
वारघडे यांच्या तक्रारीवरून 29 विद्यार्थींना मिळाले फी रुपी भरलेले शुल्क परत. सावित्रीबाई फुले विद्यापिठाने कारवाई ऐवजी दिली फक्त समज ?
दि.८ जुलै २०२४ च्या शासन परीपत्रक प्रमाणे व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुली आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय (एस.सि.बि.सि.) तसेच इतर मागासवर्गीय (ओ.बि.सि.)या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यापुर्वी ५० % होते.
त्याऐवजी आता १००% लाभ मंजूर करण्याबाबत ठराव झाला व तशा प्रकारचे परीपत्रक निघाले परंतु तरीसुद्धा अनेक महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीर पणे शुल्क घेण्यात आले त्या पैकी अजित पवार अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव ऊरसळ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अशोक भोसले यांनी शुल्क घेतल्या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांच्याकडे काही पालकांनी पुरावे देऊन तक्रारी केल्या नंतर वारघडे यांनी त्यासंदर्भात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई, अध्यक्ष विधिमंडळ सचिवालय, शिक्षणमंत्री, पोलिस महासंचालक, प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी पुणे यांचे कडे पुरावे देऊन तक्रारी केल्या.
परंतु शाळा खुद्द अजितदादा पवार यांची असल्याने अर्ज पुढे सरकत नव्हते. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे समंदित प्राचार्य यांना २९ मुलींचे बेकायदेशीर पणे घेतलेले शुल्क परत द्यावे लागले. यासाठी तब्बल ६ महिन्याचा कालावधी गेला
पैसे परत केल्याप्रमाणे त्याप्रकारची यादी प्राचार्य डॉ भोसले यांनी दि.२९ जाने रोजी कुलगुरू सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे यांना दिली.वारघडे यांच्यामुळे २९ विद्यार्थींना शुल्क परत मिळाले.