अहिल्यानगर पुणे रोडवर सुपा गावात वाहतूक कोंडी

सुपा अहिल्यानगर,
अहिल्यानगर पुणे रोडवर संध्याकाळी सातच्या सुमारास सुपा चौकामध्ये अचानक बसचा बिगड झाल्यामुळे वाहतूक कोंडी होती. सुपा गावचा आठवडे बाजार असल्यामुळे काही काळ ही वाहतूक जशाच्या तसे राहिली.
पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ट्राफिक हटवण्यात आली. त्या ठिकाणी असलेली नादुरुस्त असलेली बस हटवण्यात आली. मुख्य चौक व रहदारीचा रस्ता असल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
एसटी बसच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे . सुपा गावचा रस्ता आणि चौक मोठ्या वर्दळीचा असल्याने चौकामध्ये आणि रस्त्याने अशी वाहतुकीची कोंडी नेहमी पाहण्यात येते. यामुळे प्रवाशांना आणि स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढला पाहिजे .जेणेकरून प्रवासी आणि स्थानिक लोकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून सुटका मिळेल.