घरफोडी करायला जाण्याअगोदरच गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाच्या जाळ्यात

हडपसर :
घरफोडी करताना स्वसंरक्षणार्थ शस्त्र असावे म्हणून एका घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने देशी बनावटीचे पिस्तूल विकत घेऊन हाताळायचा सराव केला. मात्र नव्याने घरफोडी करायला जाण्याअगोदरच गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला .

समीर उर्फ कमांडो हनीफ शेख ( १९ , रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे, दोन पुंगळ्या, सोन्याचे १४४ ग्रॅम वजनाचे १० लाख ६५ हजार ६०० रुपयांचे दागिने आणि दोन दुचाकी असा १२ लाख १७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण पथकासह फुरसुंगी परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना समीर उर्फ कमांडो हा देशी पिस्तुलासह फिरत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपासात एक पिस्तूल , सोन्याचे दागिने आणि घरफोडी करण्याचे साहित्य मिळून आले.

तपासात त्याने यश मुकेश शेलार ( २० रा. तरडे वस्ती, महंमदवाडी) याच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती दिली. शेलारला अटक करुन आणखी एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले. कमांडोने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप आयक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, उप आयुक्त विवेक मासाळ , सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किती मांदळे यांच्या पथकाने केली.