क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

हडपसर :
विधवा महिलांचा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून सन्मानित करून सावित्री माई फुलेंचा समानतेचा विचार अंगीकृत करावा. असे मत महेंद्र बनकर यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन गांधी चौक हडपसर येथे करण्यात आले.

सत्यशोधक सावित्री माई फुले यांनी विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. त्या विचारांचे स्मरण करून इथून पुढे सर्व कार्यक्रमा अंतर्गत विधवा महिलांचा सन्मान करण्यात यावा हा विचार यावेळी मांडण्यात आला.
विधवा महिलांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून समाजाने त्यांनाही इतर महीलांप्रमाने वागणूक द्यावी हा सत्यशोधक विचार कृतीतून सादर केला पाहिजे. असे मत व्यक्त करण्यात आले .

याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक विजय देशमुख, गणेश वाडकर, प्रमोद सातव, स्वप्निल सातव, अविनाश काळे, बाळासाहेब हिंगणे, सचिन आल्हाट, मोहन चिंचकर तसेच सर्व प्रतिष्ठानचे सदस्य आणि महिला वर्गाचे उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भिसे आभार मुकेश वाडकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन अर्जुनराव प्रतिष्ठानचे महेंद्र बनकर आणि हडपसर मधील सर्व संस्था यांच्यावतीने करण्यात आले होते