सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजाला प्रेरक -डॉ. भाऊसाहेब गव्हाणे.

दौंड, केडगांव
येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयातील मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना,ग्रंथालय विभाग यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या अनुषंगाने लेखक वाचक संवाद या विषयावर डॉ. भाऊसाहेब गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले एक लेखक म्हणून कीती महान होत्या याबाबत बोलताना त्यांनी त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला. त्यांचे विचार आज विद्यार्थ्यांनी अंगी बाळगणे गरजेचे आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. नानासाहेब जावळे यांनी लेखकाची जडणघडण स्पष्ट करून सांगितली.
यावेळी प्रसंगी डॉ. भाऊसाहेब दरेकर, डॉ.अशोक दिवेकर, डॉ. शोभा वाईकर,प्रा.अरविंद मिंधे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन डॉ. अनुराधा गुजर यांनी केले. तर डॉ. मनीषा जाधव यांनी कार्यक्रम संयोजन व आभार मानले .