१.८० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश..

१.८० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश..

वानवडी पोलिसांकडून म्युल अकाउंट टोळीचे ५ जण जेरबंद.

वानवडी,

बनावट बँक खाती (म्युल अकाउंट्स) उघडून देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीच्या मुख्य सूत्रधारासह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या टोळीने बनावट खात्यांच्या माध्यमातून देशभरातील १९ नागरिकांची एकूण ₹१,८०,१५,७९५/- (एक कोटी ऐंशी लाख पंधरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये) ची ऑनलाईन फसवणूक केली आहे.

श्रवण राजेंद्र अंकुशे (वय २५, रा. उंड्री, मुख्य सूत्रधार), हरीओम हरीराम साहू (वय २४, रा. साळुंके विहार रोड), सौद इदफान शेख (वय २३, येरवडा), साहील रौफ शेख (वय २५, येरवडा), तालीब नुरमोहम्मद शेख (वय २५, येरवडा) अशी त्यांची नावे आहेत.
मुख्य सूत्रधार श्रवण अंकुशे हा त्याच्या हस्तकाद्वारे तरुणांना प्रति खाते ५,००० रु.चे आमिष दाखवून त्यांच्या नावे बँक खाती उघडून घेत असे. या खात्यांचा वापर ऑनलाईन सायबर फ्रॉडचे पैसे वळवण्यासाठी केला जात होता. प्राप्त डेटाच्या आधारे वानवडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई परिमंडळ 5 च्या पोलीस उपआयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले, पोलीस अंमलदार गणेश आगम, अमोल पिलाणे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दया शेगर, आशिष कांबळे, दिपक क्षिरसागर, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अभि चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, महिला पोलीस अंमलदार चैत्राली यादव, रुपाली दिवटे यांनी सहभाग घेतला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!