हडपसर-मांजरी, कोंढवा-उंड्रीत फ्लेक्स-होर्डिंगचा सुळसुळाट

हडपसर-मांजरी, कोंढवा-उंड्रीत फ्लेक्स-होर्डिंगचा सुळसुळाट

पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांना अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग तातडीने हटवण्याचे लेखी आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात आदेश फक्त कागदावरच राहिला आहे.

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग 15, 16, 17) आणि कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग 40 आणि 41) मध्ये चौकाचौकात, रस्त्यावर, अगदी सार्वजनिक प्रकाश व्यवस्थेच्या खांबांवरही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि मोठे होर्डिंग कायम आहेत.पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू असतानाही हे फ्लेक्स झळकत असल्याने हा थेट आचारसंहिता भंग आहे. तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने प्रशासन झोपले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

अधिकारी निकाळजे यांचा खुलासा –
याबाबत कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाचे आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी निकाळजे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
संपूर्ण हद्दीत सर्व ठिकाणचे सर्व फ्लेक्स काढण्याचे काम सुरू आहे. आमच्या क्षेत्रीय कार्यालयात आकाशचिन्ह विभागात 3 कर्मचारी कार्यरत आहेत.”या खुलाशामुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन मोठ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या एवढ्या मोठ्या हद्दीत फक्त 3 कर्मचारी? त्यामुळे शेकडो फ्लेक्स कधी हटणार?

प्रशासनाने उत्तर द्यावे –

1. प्रभाग 15, 16, 17, 40, 41 मध्ये प्रत्यक्ष पाहणी झाली का? किती फलक अनधिकृत आढळले?
2. किती जणांना नोटीस बजावली?3. आतापर्यंत किती फ्लेक्स हटवले आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर काय कारवाई?

आदेश कागदावर मिरवणार की रस्त्यावर कारवाई दिसणार? याकडे संपूर्ण हडपसर सह पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!