वाघोली बाजारतळावर मृतदेह आढळला

वाघोली बाजारतळावर मृतदेह आढळला

पोलिस ठाण्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर घटना; पोलिसांचा तपास सुरू

वाघोली : वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत, पोलिस ठाण्यापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावरील बाजारतळावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने गर्दी हटवून परिसर मोकळा केला असून, आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.

मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे कारण याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात वाघोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारतळ परिसरात ही घटना घडली आहे. मात्र, घटनेबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून, पोलिस तपासानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!