भारती हॉस्पिटलची संरक्षक भिंत कोसळली; ५० दुचाकी ढिगाऱ्याखाली

भारती हॉस्पिटलची संरक्षक भिंत कोसळली; ५० दुचाकी ढिगाऱ्याखाली

अग्निशमन दलाचे तातडीने बचावकार्य; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पुणे :

धनकवडी येथील भारती हॉस्पिटलच्या आवारातील मोठी संरक्षक (सीमाभिंत) शनिवारी अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. भिंत कोसळताच तिच्या खाली उभ्या असलेल्या सुमारे ५० दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली अडकली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, भिंत अचानक कोसळल्याने दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानाचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. दुर्घटनेच्या वेळी भिंतीलगत कोणतीही व्यक्ती नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

दरम्यान, भिंत कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून घटनेची चौकशी सुरू आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!