नवरात्र महोत्सव आयोजन समितीची नवी कार्यकारिणी जाहीर

नवरात्र महोत्सव आयोजन समितीची नवी कार्यकारिणी जाहीर

हडपसर: सन २००५ मध्ये स्थापन झालेल्या पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटनेच्या २२ व्या वर्षातील नवरात्र महोत्सव २०२६-२७ आयोजन समितीच्या सर्वसाधारण बैठकीत नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी आगामी नवरात्र महोत्सव अधिक भव्य, दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीत बंटीशेठ ऊर्फ दिपक दिगंबर हिंगणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी राजेंद्र मारुती डांगमाळी आणि दयानंद भारत राऊत यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी जगन आबनावे, अनिल अग्रवाल, गणेश पानकर, आकाश तिखे, बाळासाहेब भालसिंग आणि शहनाज बागवान यांची निवड करण्यात आली.

खजिनदारपदी प्रतिक टिळेकर, सहखजिनदारपदी संतोष ऊर्फ माऊली (आप्पा) हिंगणे, सचिवपदी सुशीलकुमार भिसे आणि सहसचिवपदी चंद्रकांत टिळेकर यांची निवड करण्यात आली. महाप्रसाद व्यवस्थापक म्हणून ईश्वर लोखंडे, गणेश अग्रवाल, किरण ससाणे, गणेश भुजबळ आणि मयूर फडतरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

देवीचे सेवेकरी म्हणून सौ. सविता बाळासाहेब भिसे, दत्तात्रय भगवान सकट (गुंड्याभाऊ), हिरामण लोखंडे आणि अक्षय तिखे यांची निवड करण्यात आली. महिला कार्यकारिणीत विमल आरु, पुष्पा अग्रवाल आणि केवल शिंदे यांचा समावेश करण्यात आला.

वरिष्ठ कार्यकारिणीत संस्थापक बाळासाहेब भिसे, कार्याध्यक्ष शैलेशशेठ नवले, उपाध्यक्ष प्रितमशेठ बडदे, महाव्यवस्थापक प्रविणशेठ टिळेकर आणि सचिव राजेंद्र (दादा) गायकवाड यांची निवड करण्यात आली.

बैठकीत मागील वर्षाच्या जमा-खर्चास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच आगामी नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वांनी एकजुटीने महोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नूतन कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रविण टिळेकर यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!