ससाणे नगरातील विशेष मतदार नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ससाणे नगरातील विशेष मतदार नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हडपसर,

ससाणे नगर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्या निकेतन संस्था (माळीणबाई शाळा) येथे मतदान करणाऱ्या मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिबिरात उपस्थित राहून विविध अर्ज भरत आहेत.

या शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, नाव समाविष्ट करणे तसेच इतर आवश्यक अर्ज भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्या मतदार यादीतील माहितीची पडताळणी करून आवश्यक बदल त्वरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे शिबिर दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असून, अमर स्वीट समोर, ससाणे नगर मुख्य रस्ता येथे आयोजित करण्यात आले आहे.

प्रशासनाने ज्ञानप्रबोधिनी विद्या निकेतन संस्था (माळीणबाई शाळा) येथे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपल्या कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनाही या शिबिराची माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!