तुटलेल्या चेंबरमुळे JSPM ते काळे बोराटे नगर रस्त्यावर अपघाताचा धोका

तुटलेल्या चेंबरमुळे JSPM ते काळे बोराटे नगर रस्त्यावर अपघाताचा धोका

कुमार पेबल सोसायटीशेजारी धोकादायक स्थिती; चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

हडपसर : कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ४१ मधील JSPM ते काळे बोराटे नगर रस्त्यावर कुमार पेबल सोसायटीशेजारी ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटले आहे. अरुंद रस्त्यावर ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या रस्त्यावर आधीच वाहतुकीसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. त्यात चेंबरचे झाकण तुटल्यामुळे मोठ्या चारचाकी वाहनांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी तुटलेले चेंबर लक्षात न आल्यास दुचाकीस्वार अथवा पादचाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अपघाताची वाट न पाहता तातडीने दुरुस्ती करा!

संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून चेंबरचे झाकण बसवावे. दुरुस्ती होईपर्यंत परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!