‘या’ ठिकाणी करा ‘नो हॉकर्स झोन’

‘
हडपसर , हडपसर , काळे पडळ, वानवडी पोलिस ठाण्याच्या
हद्दीतील हडपसर ससाणे नगर, काळे बोराटे नगर, चिंतामणी नगर , सय्यद नगर , महमंद वाडी, हांडेवाडी ,सातव नगर, रामटेकडी dp रस्ता या ठिकाणी ‘नो फेरीवाला क्षेत्र’ (नो हॉकर्स झोन) घोषित करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे प्रत्यक्ष भेटीद्वारे केली आहे.

हडपसर ससाणे नगर , हांडेवाडी रस्ता ,सय्यद नगर रस्ता,महमद वाडी रस्ता, काळे बोराटे नगर रस्ता यासर्व रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर अतिक्रमण केले आहे. तसेच विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळ विक्रेते, टेम्पो मधून अनधिकृत विक्री करणारे त्याचबरोबर रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो.

पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. याबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिस आयुक्तांची समक्ष भेट घेऊन या तक्रारी दिल्या आहेत.

स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणींचा विचार करून हडपसर ससाणे नगर , संपूर्ण हांडेवाडी रस्ता, सय्यद नगर – महमद वाडी रस्ता , काळे बोराटे नगर रस्ता या सर्व रस्त्यावर ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्याकरिता स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे .तसेच शासनाच्या सर्व विभागाशी पत्र व्यवहार सुरू असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हडपसर ससाणे नगर नागरी कृती समितीने या अनुषंगाने हडपसर पोलिस स्टेशन, काळे पडळ पोलिस स्टेशन, हडपसर वाहतूक नियंत्रण विभाग, काळेपडळ वाहतूक नियंत्रण विभाग ,हडपसर क्षेत्रीय कार्यालय ,पुणे मनपा येथे मागणी पत्र सादर केले आहे .