हडपसर मधील दोन पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू

Oplus_131072
हडपसर
मालवणमध्ये तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर हडपसर मधील दोन पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.
पुण्यातील पाच जण पर्यटक अंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाचपैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता त्यामधील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
स्थानिक नागरिकांना एका पर्यटकाला वाचण्यात यश आले आहे. मृत दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत. समुद्रात खोल जाऊ नये, असे स्थानिकांनी सांगून देखील हे पर्यटक खोल समुद्रात गेल्याने सदर दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (२२) अशी मृतांची नावे आहेत. तर कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे (२०), ओंकार अशोक भोसले (२४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली.
यामधील तीनजण अंघोळीसाठी खोल समुद्रात गेले होते. स्थानिकांनी त्यांना खोल समुद्रात जाऊ नका, असे सांगितले. तरी देखील तिघेजण पर्यटक खोल समुद्रात आंघोळीसाठी गेले. त्यानंतर तिघेही पाण्यात बुडत लागले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तीनपैकी एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. तर इतर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.