शहरातील वाहतूक बदलाबाबतचे आदेश जारी

पुणे
शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता भारती विद्यापीठ, डेक्कन व कोंढवा वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्याबाबतचे काही अंतिम आणि काही तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत कदम प्लाझा पासून लेक टाऊन (बिबवेवाडी) कडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रामनाथ स्विट्स समोरील भिंतीपासून ते ग्रीन पार्क इमारत (पिझ्झा हट समोरील) भिंतीपर्यंत (१७६ मीटर) दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना नो- पार्किंग क्षेत्र करण्यात येत आहे.
डेक्कन वाहतूक विभागांतर्गत कमला नेहरु पार्क प्रवेशद्वारासमोरील सनराईज सोसायटी लेन रस्त्यावरील सरदेसाई रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना नो- पार्किंग क्षेत्र करण्यात येत आहे. तसेच कोंढवा वाहतूक विभागांतर्गत ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वार ते ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मधील शॉपरशॉप शेवटचे दुकान पर्यत (३०० मीटर) नो- पार्किंग करण्यात करण्याचे अंतिम आदेश जारी करण्यात आले आहेत.

वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश:
डेक्कन वाहतुक विभागांतर्गत बी.एम.सी.सी. मार्गावरील एन.सी.सी. कँप प्रवेशद्वारापासून ते एस.एस.सी बोर्ड कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत (छत्रपती शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे समोरील बाजू २० मीटर) नो- पार्किंग क्षेत्र करण्यात येत आहे.
प्रभात रोड गल्ली क्र.२ व गल्ली क्र. ३ ला जोडणारी उपगल्ली क्र. १ मध्ये दक्षिणेस प्रथमेश सोसायटी व उत्तरेस पश्चिमेस अमित बोसम सोसायटीपर्यंत फक्त दुचाकी करीता पी-१, पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. दक्षिणेस असलेल्या लक्ष्मी निवास ते उत्तरेस असलेल्या अभिनंदन बंगला दरम्यान, तसेच लक्ष्मी निवास ते ग्रीनपार्क यातील सोसायटीचे प्रवेशद्वार सोडून फक्त चारचाकी करीता पी-१, पी-२ पार्किंग करण्यात येत आहे.
उत्तरेस असलेला अभिनंदन बंगला ते निसर्ग सोसायटी, सदर ठिकाणी सोसायटीचे प्रवेशद्वार सोडून फक्त चारचाकी करीता पी-१. पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. निसर्ग सोसायटीच्या बाहेरील बाजूस असलेल्या अॅड. अभ्यंकर चौक या ठिकाणी १५ फूट अंतरावर चारचाकी वाहनांसाठी पार्किंग करण्यात येत आहे.
या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस जवळ, बंगला क्रमांक ६, विमानतळ मार्ग, पुणे यांच्या कार्यालयात २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.