ज्येष्ठ नागरिक संस्थेचा 19 वा वर्धापन दिन
हडपसर मधील ज्येष्ठ नागरिक संस्थेचा 19 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंगणे मळा मधील विरंगुळा केंद्रामध्ये धनराज भावसार यांचे अध्यक्षेखाली वर्धापन दिन झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लेखक माननीय प्रा.जे.पी. देसाई , योगेश ससाणे, ,मारुती तुपे उपस्थित होते.
.ज्येष्ठ नागरिक संस्था १६ जाने. १९०६ साली स्थापन करण्यात आली आहे.दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सभा घेतली जाते .त्यामध्ये मान्यवरांचे भाषणे, प्रवचने, भजन असे कार्यक्रम आयोजित केले जातात.
या प्रसंगी प्रा. जे.पी. देसाई म्हणाले की वयाचे बंधन न बाळगता उत्साही रहा. आनंदी रहा. वर्तमानात जगा.तुमच्या आवडी निवडी जपा, छंद जोपासा. जमेल तेवढी समाज सेवा करा. परमपूज्य महात्मा गांधींनी आयुष्याच्या शेवटपर्यंत देशसेवा केली.
प्रा.ग.प्र. प्रधान यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सहा कादंबऱ्या देशाला अर्पण केल्या. संत गाडगे महाराज शेवटपर्यंत समाजसेवा करीत राहिले अशी उदाहरणे देऊन जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रेरीत केले. सदैव कार्यरत रहा असा संदेश दिला. यावेळी सावली फाउंडेशन अध्यक्ष योगेश ससाणे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की समाजकार्य करतांना खूप अडचणी येतात. अडचणी वर मात करून पुढे जावे लागते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्यकुमार दोषी तर आभार श्रीधर देसाई यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमावत , पुरूषोत्तम ठाकूर , मोहन कुलकर्णी, शंकर कुमावत, विजय कुलकर्णी ,सुभाष बडदे यांनी परिश्रम घेतले.