शासकीय चित्रकला परीक्षेत स्वामी विवेकानंद विद्यालयाचे यश
केडगाव,
आंबेगाव – पुनर्वसन येथील जय भवानी पुनर्वसन शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद विद्यालय विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला परीक्षेत यश मिळाले आहे.
दरवर्षी सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्यात येतात, त्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत बसतात. या वर्षी एलिमेंटरी /इंटरमेजीएट ग्रेड परीक्षेसाठी विद्यालयातून 23 विद्यार्थी बसलेले होते, त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना अ व ब श्रेणी मिळालेली आहे, बाकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, विद्यालयाचा निकाल हा दरवर्षी 100% लागतो असे विद्यालयाचे कलाशिक्षक हेमंत केंजळे यांनी सांगितलेले आहे
दहावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा खूप मोठा फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले. यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे कलाशिक्षक हेमंत केंजळे यांचे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर तसेच सचिव निढाळकर इतर संस्थेचे हरेश्वर जगदाळे गणेश चव्हाण, पदाधिकारी,तसेच पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, युवा उद्योजग रोहित गजरमल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी केडगाव,आंबेगाव- पुनर्वसन, वाखारी,परिसरातील सर्व पालक वर्ग, ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.