अभिवादन सोहळ्यानिमित्त मोफत विशेष बससेवा

हडपसर :
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त मोफत विशेष बससेवा देण्यात येणार आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारी चार वाजल्यापासून बुधवारी (१ जानेवारी) रात्री बारा वाजेपर्यंत बससेवा सुरू असणार आहे. त्यासाठी लोणीकंद विभाग आणि शिक्रापूर विभागातून विविध मार्गांवरून बस धावणार असून, अनुयायांना सुलभ प्रवास करता येणार आहे.