भाजपच्या शहर ओबीसी मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी सविता हिंगणे

भाजपच्या शहर ओबीसी मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी सविता हिंगणे

हडपसर : भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी सविता हिंगणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शहर अध्यक्ष धीरज घाटे व ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष विकास लवटे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. सविता हिंगणे या गेल्या अनेक वर्षांपासून आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षामध्ये सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत.

ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच युवक व युवतींना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!