उंड्री चौक ते कडनगर चौकदरम्यान अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा!

उंड्री चौक ते कडनगर चौकदरम्यान अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा!

४८ हजार ८०० चौ. फूट अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १६ टपऱ्या व शेड जागेवरच हटविल्या

पुणे : कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत उंड्री चौक ते कडनगर चौकादरम्यान पुणे महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई करण्यात आली. रस्ता, फ्रंट मार्जिन तसेच रस्ता रुंदीकरणाच्या जागेतील अनधिकृत कच्चे-पक्के बांधकाम, शेड आणि इतर अतिक्रमणे या कारवाईत हटविण्यात आली.

या कारवाईत तब्बल ४८ हजार ८०० चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच १६ टपऱ्या व शेड जागेवरच निष्कासित करण्यात आले.

महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली. यावेळी उपअभियंता संदीप शिंदे, कनिष्ठ अभियंता ऋतुजा चिलकेवर, कनिष्ठ अभियंता रमीज फरास, आरेखक जयश्री जोशी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक दीपक कुमदाळे, अमोल धुळे आणि प्रशांत कोळेकर उपस्थित होते.

कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलीस कर्मचारी, पिंजरा वाहन, गॅस कटर आणि जेसीबी यंत्रणेचा वापर करण्यात आला.

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुचिता पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे रस्ते व सार्वजनिक जागांच्या वापरावर निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने ही कारवाई केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!