हडपसर मांजरी क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दि.१७/११/२०२६ रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंत्रा

हडपसर मांजरी क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दि.१७/११/२०२६ रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंत्रा

हडपसर मांजरी क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दि.१७/११/२०२६ रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंत्रा सोसायटी केशवनगर येथे अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. सदर कारवाईसाठी हडपसर क्षेत्रिय कार्यालय व मध्यवर्ती पथक काकडील संपूर्ण अतिक्रमण स्टाफ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलिस कर्मचारी ,बिगारी सेवक ,अतिक्रमण निरीक्षक सहायक अतिक्रमण निरीक्षक , ओपन ट्रॅक ,पिंजरा वाहन अशी यंत्रणा वापरण्यात आली. हडपसर मांजरी क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक श्री. साईनाथ निकम, तसेच सहायक निरीक्षक श्री.किरण शिंदे, प्रशांत कोळेकर विनोद दुधे अमोल धुळे, सुजित तोगरे,वैभव जगताप, अरविंद बोरकर, तेजस दाभाडे, श्लोक तारु यांच्या धडक कारवाई पथकाने अतिक्रमण निर्मूलन विभाग उपआयुक्त श्री.सोमनाथ बनकर, महापालिका सहायक आयुक्त श्री.कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.
सदर कारवाईत काऊंटर 26, लोखंडी टेबल 7, स्टील टेबल 1, फ्रिज 4, सिलेंडर 3, लोखंडी स्टॅंड 4, टेन्ट 4, टेबल व खुर्ची 33, शेगडी 1 व सुमारे 10 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच अंदाजे 5500 चौरस फूट कच्चे पक्के शेड तोडण्यात आले.
अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक श्री.साईनाथ निकम यांनी सांगितले

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!