
कोंढवा प्रभाग समिती : १९ जण पात्र, ३ अपात्र
पुणे : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीवर बिनसरकारी व समाजलक्षी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आलेल्या २२ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून १९ अर्ज पात्र, तर ३ अर्ज अपात्र ठरले आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त सुनिता पानसरे यांनी ही यादी जाहीर केली आहे.
पात्र ठरलेले : उमेश कोंढाळकर, उमेश धांडेकर, शंकर सांगळे, विकास भुजबळ, निखिल मुनोत, सुखदेवसिंह चारण, संदीप धांडेकर, दिपक पालवे, रक्षा तंवर, दिनेश बहीरट, दिनेश चौधरी, लंकेश घुले, अॅड. लक्ष्मण घुले यांच्या चार संस्था, उत्तम फुलावरे, प्रमोद सातव आणि गौरव गायकवाड.
अपात्र ठरलेले : ज्ञानोबा मुंढे (प्रकृती केअर फाउंडेशन), सय्यद हबीब यासीन (ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन) आणि कविता पटेकर (सम्यक संकल्प संस्था).

