गंगा व्हिलेज सहकारी गृह रचना सोसायटी वर सत्यमेव जयते पॅनलला बहुमत.

गंगा व्हिलेज सहकारी गृह रचना सोसायटी वर सत्यमेव जयते पॅनलला बहुमत.

हडपसर,

हांडेवाडी रोड येथील गंगा विलेज सहकारी गृह रचना सोसायटीवर 19 पैकी 14 संचालक सत्यमेव जयते पॅनलचे निवडून येत स्पष्ट बहुमत मिळवले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 672 पैकी 480 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्यमेव जयते पॅनलचे अरमळ अविनाश, कुंडू रतन, ठाकरे विनीत, पाटील गणेश, बरणवाल रवी, अँड. बिजली बंदुसाहब, माने सतीश, मुळे विवेक, मेनोन मधु, मोरे मोहन, सायकर रोहिदास, बरणवाल ज्योत्सना, भुजबळ निवृत्ती व कापडे सुवर्णा हे 14 संचालक निवडून आले.

विरोधी परिवार पॅनलच्या माजी चेअरमन योगेंद्र गायकवाड यांचे फक्त पाच संचालक निवडून आले. हांडेवाडी रोड परिसरातील गंगा विलेज सोसायटी ची निवडणूक नेहमीच चर्चेत होत असून या सोसायटीची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे. सोसायटीच्या नावावर सातबारा झालेली हडपसर परिसरातील ही एकमेव सोसायटी असल्याची माहिती सोसायटीचे माजी चेअरमन अँड. कबीर शेख व माजी सेक्रेटरी पोपट वाडकर यांनी दिली.

सत्यमेव जयते पॅनल चे उमेदवार निवडून आणण्यासाठी अँड. कबीर शेख, पोपट वाडकर, विकास भुजबळ, दिलीप बिडवे, गणेश वाडकर, संतोष बोबडे, विशाल येवले, दीपक अवचार, संतोष कारंजकर, प्रशांत दुधाळ, विवेक सातपुते, डॉ. शोभनाथ यादव, डॉ. अविनाश लोडम, संतोष ताकभाते, संजय पवार, रवी मिश्रा, शहा बर्फी वाले शेख फय्याज,गणेश नायडू, युवराज सावंत, अनिल भुजबळ, रवी पोटे, शेख समीर व इतर सभासदांनी व महिलांनी मेहनत घेतली. माजी नगरसेविका सौ. विजया वाडकर यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. —-

गायकवाड योगेंद्र, शेख दिलावर ,जगताप रुचिता, जमदाडे नीता, जगताप मधुकर हे पाच विरोधी परिवार पॅनल चे निवडून आले

-शिवाजी बडे

निवडणूक निर्णय अधिकारी

 

 

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!